कधी लंडनच्या मादाम तुसा मध्ये गेलात? भारतीय आणि परदेशी सुप्रसिद्ध व्यक्तींचे मेणाने बनवलेले पुतळे पाहायला? तुम्हापैकी काहींनी पहिले असतील, तर काहींनी नसतीलही. पण आता निराश होण्याची गरज नाही कारण आपण हे सर्व आपल्या येथेही पाहू शकता. तेही आपल्या महाराष्ट्रात. मुंबई-पुण्यापासून अगदी जवळ. सध्या केवळ ३० सुप्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे आहेत. त्यातील काहींचे छायाचित्रे येथे प्रसिद्ध करीत आहे. शिल्पकाराने पुतळे हुबेहूब बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला बऱ्याच अंशी यशही आलेले आहे. त्याने बनवलेली शिल्पे दाद देण्यासारखी आहेत.
CELEBRITY WAX MUSEUM
ठिकाण :
लोणावळा, जुना मुंबई-पुणे महामार्ग क्र. ४
वरसोली पुणे.
संकेत स्थळ: http://www.celebritywaxmuseum.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा