मरण, मृत्यू म्हणजे नक्की काय? हा प्रश्न मला नेहमी पडतो. माणूस मरतो म्हणजे काय होते? काही लोक म्हणतात मरणापेक्षा जीवनाचा विचार करा. ते सर्व ठीक आहे पण मरण अटळ आहे? याचं उत्तर 'हो' च आहे. जो जन्माला आला तो मरणारच. यात काडीमात्र शंका नाही. जिथे सुरुवात आहे, तिथे अंत आहे. पण तरीही मला हाच प्रश्न पडतो. माझे विचारचक्र सतत चालू असते. उत्तराचा शोध मला घ्यायचा आहे. मला हेही माहित आहे की याचे उत्तर सापडणे कठीण आहे.
माझे स्व:ताचे एक मत आहे मृत्यूबद्दल. मरण म्हणजे एक झोप, कधीही न संपणारी एक झोप. माणूस रोज झोपतो आणि जागा होतो. पण जेव्हा तो कायमचा झोपतो तेव्हा तो कधीही जागा होत नाही त्यालाच मरण म्हणतात. कधी असे झाले का आपण झोपलो आणि सकाळी जाग आली की वाटते, आत्तातर झोपलो लगेच जाग आली. जो झोपेचा ८-९ तासांचा कालावधी फक्त ५-१० मिनिटांचा वाटतो. अशा झोपेला आपण गाढ झोप म्हणतो. पण मला ...
माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. कारण मला मागील काही आठवत नाही. माझा विश्वास मी जे बघतो, मी जे अनुभवतो त्यावर आहे. मी चुकीचा असेलही. मला मृत्यूपलीकडील जग बघायचं आणि तो माझा अनुभव सर्वांना सांगायचाय. मला हेही ठाऊक आहे की ही जगातील सर्वात अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण मी मेलो की परत येणार नाही हे सत्य आहे.
मला गूगलवर मृत्यूबद्दल शोधताना एक संकेतस्थळ सापडले. त्याच्यानुसार माणूस हा ४ शरीरांनी बनलेला आहे. १. भौतिक २.मानसिक ३. बौद्धिक ४. सूक्ष्म अहंकार वगैरे.. या संकेतस्थळवर बरचं काही लिहिले आहे.
पण मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. पुन्हा एकदा मी वरील संकेतस्थळावरील माहिती वाचणार आहे. बघूया माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळते की नाही?

You cant remember what you were in last birth. Because brain remembers everything but that to get dead when you are dead means totally dead. The only thing get transferred is energy(Soul) to new body. And Energy dosent have brain to remember. It just transferred from one form to another form.
उत्तर द्याहटवाRegards
Swapnil
WELL SAID !!!
हटवाsole is remmember but new life new birth body totally change but 7 chakra valay activate after remember every thing in before life
हटवा