कालच आदेश आला आहे टोलनाके बंद करण्याचा. त्या आदेशान्वये काही ठिकाणी आंदोलने सुरु झाली. हे फारच छान आहे. ऐकून मनाला आनंद झाला. कारण माझ्यासारखे अनेक जणांना या टोळधाडीचा त्रास होत आहे. एक मुंबई -पुणे एक्स्प्रेस सोडला तर बाकी सर्व रस्ते फारच दयनीय आहेत. त्यात त्यावर टोल? प्रत्येक सामान्य माणसाच्या मनातील चीड या आदेशाने बाहेर आली आहे.
टोलचा हिशोब तर कधीच कळत नाही. वर्षानुवर्षे टोल हा चालूच असतो. टोलचा त्रास हा सर्वांनाच होत आहे. प्रवासात जेवण्याच्या खर्चापेक्षा टोल जास्त होतो. या टोलने सगळ्यांचे जीवन हराम केले आहे. या महागाईच्या पर्वात सामान्य माणूस या टोळधाडीने आणखीनच त्रस्त झाला आहे. त्याचे जीवन त्रासून गेले आहे. आता लवकरच त्याची या
टोळधाडीमधून मुक्तता होणार आहे?
याचे उत्तर 'नाही' हेच आहे. कारण आंदोलने काही दिवस होणार, तोडफोड होणार. पोलीस येणार, अटका होणार, केस दखल होणार. हाती मात्र काही येणार नाही. उलट झालेले नुकसान मात्र सामान्य माण साकडूनच टोल वाढवून वसूल केले जाईल. मग या आदेशाचे काय? फायदा कोणाला? सामान्य माणसाला की आदेश ज्यांनी दिला त्यांना? याचा विचार आपणच केलेला बरा. कारण कोणीही सामान्य माणसाचा विचार करीत नाही. जो तो केवळ स्वता:चा विचार करतो.
या आदेशाने 1-2 टोलनाके बंद होतील काही दिवसांसाठी. पण हळूच ते चालूही होतील कुणाच्याही नकळत. हीच खरी गंमत आहे. मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर. सामान्य माणूस बिचारा यात भरडला जातो.
मागे एका माननीय नेत्याने सांगितले की काहीही झाले तरी विक्रोळीला डम्पिंग ग्राउंड होऊ देणार नाही. मोठे आंदोलन केले, पोस्टरबाजी केली, त्याबळावर विधानसभा दर्शन त्यांना झाले. पण डम्पिंग ग्राउंडचे काय झाले? काय होणार, मस्तपैकी सुरु झाले! रोज मुंबईतला कचरा त्यात टाकल जाऊ लागला. यात फायदा कोणाचा झाला? सामान्य माणसाचा, त्याला डम्पिंग ग्राउंड मिळाले की !
तसेच या टोलनाके बंदच्या आदेशाचे होणार.
आज वातावरण तापले आहे. चला मजा बघूया.
बिचारा सामान्य माणूस :(

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा