सोमवार, २२ जुलै, २०१९

कैफियत माझी



आभाळातून कधी येणार तू
मुसळधार कधी बरसणार तू
जमीन माही तहानलेली
माय माही आसूसलेली
डोळ्यातून आसवे वाहती
काळीज माहे थरथरती
तू असा कसा जुलमी झाला
माह्या लेकरांचा वैरी झाला
तुह्या काळजाला पाझर कधी फुटल्
आभाळातल कधी पाणी बरसल्
वाट पाहूनी माहा बाप गेला
जीवनाचा दोर तोडला
माय बापूडी हरुन गेली
अंथरुणात खिळून गेली
काय करू मी बापडा
उपाशी राहीला काळजाचा तुकडा
आभाळातून कधी येणार तू
मुसळधार कधी बरसणार तू

शनिवार, २० एप्रिल, २०१९

ढग : शुभ्र अन् काळे




शुभ्र ढग आभाळात
सगळे त्यांच्या प्रेमात

काळे ढग बिचारे
घाबरतो आपण सारे

शुभ्र दिसण्यात गोजिरे
काळे एकदम गहिरे

शुभ्र असून काय उपयोग
ना कशाचा विनियोग

काळे बरवसतात पाणी
सहन करूनही मानवाची मनमानी

रंगरुप पाहून न भाळावे
कर्म पाहून घ्यावे

शुक्रवार, १९ एप्रिल, २०१९

दृष्टिकोन

चांगलं वाईट काही नसतं
तो फक्त आपला दृष्टीकोन असतो
बरोबर चूक काही नसतं
ती फक्त पाहण्याची नजर असते
पाप पुण्य काही नसतं
ती फक्त आपली भावना असते
निर्णय कधीही चूकीचे नसतात
ते केवळ परिणामांवर अवलंबून असतात
जगावं तर असं जगा
सर्व जगाला हेवा वाटावा
मरावं तर असं मरावं
सर्व जगाला चटका लावून जावं