तो पहिला स्पर्श वेडावतो मला
चोरून चोरून बघतानाचे क्षण
हळुवारपणे झालेले नजरभेटीचे क्षण
पहिले वाहिले आपल्या हातांचे मिलन
कळत नकळत घडलेले अपुल्या ओठांचे मिलन
ते पहिले प्रेम त्या प्रेमाच्या आठवणी
ती पहिली भेट त्या भेटीच्या आठवणी
तुझा तो हवा हवासा वाटणारा सुंदर मुखडा
लाजेने लालीलाल होणारा तुझा मुखडा
तुझा तो आखीव रेखीव बांधा
अप्सरा ही फिकी असा बांधा
डोळे भरून पहावे असे तुझे यौवन
नजरेनेच फक्त अनुभवत राहावे तुझे यौवन
तू अन मी एकरूप होताना
अपुले श्वास धुंद होताना
वाढत जाणारी छातीची धडधड
परम क्षणाला शांत होणारी धडधड
ती पहिल्या प्रेमाची आठवण
ती पहिल्या प्रेयसीची आठवण
मनातूनी जाता जाई ना
काय करावे ते मला समजे ना
